दि 26/4/3021 शिवाजी सेलोकर
⭕ जिल्हा परिषद शाळेचा ऊपयोग क्वारंटाईन सेंटर म्हणून केल्यास रूग्ण संख्या कमी करता येऊ शकते व रूग्ण गावातच राहील्याने
घरचा डबा घरचीच खाट असल्याने कमी खर्चात ज्यास्त पेशंट बरे होतील, अशी उपाय योजना करने काळाची गरज आहे .
कोवीड पेशंट प्रथम अवस्थेत उपचार करणे गरजेचे आहे लक्षणॆ दिसताच जागेवरच चाचणी करून औषध उपचार केल्यास पेशंट प्रथम अवस्थेत लवकर बरा होतो.
हे आता सर्वानाच समजल आहे . गावातील प्रतिष्ठीत लोकांनी, तरुणांनी सामाजिक कार्यकर्ते यांनी मनावर घेतल्यास हे सहज शक्य आहे
दुसरे आणखी एक,पेशंटची देखभालीसाठी गावातील, अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा वर्क्स, नर्स(NM) मलेरिया (MPW) तसेच गावात एक जबाबदार शासकीय डाॅक्टर यांची नेमणूक करुन त्या डाॅक्टरांनी आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा गावात व्हिजीट देऊन पेशंटची परिस्थिती कशी आहे याबाबत मार्गदर्शन करुन औषधोपचार करावा तसेच पेशंट वर देखरेख ठेवण्यासाठी व त्यांना येणार्या अडीअडचणी सोडवण्यासाठी गावातील ग्रामसेवक ,तलाठी ,ग्रामपंचायत शिपाई, कोतवाल, यांना शासकीय आदेश दिले तर काम फार सोपे होईल
असे केल्याने खेड्यातली परीस्थिती लवकर सुधारणा होऊ, शकते असे मला वाटते.
हि पोस्ट राज्याच्या मुख्यमंत्री यांचे पर्यंत जाऊ द्या व आपल्या कडे जेवढे ग्रृप असतील तेवढ्या सर्व ग्रृप वर पाठवा व ही पोस्ट सार्वजनिक करा.