*पोंभुर्णा तालुक्‍यातील जुनगांव – देवाडा बुज- नांदगांव – थेरगांव –देवाडा खुर्द – पोंभुर्णा – घनोटी – उमरी या रस्‍त्‍यावरील मोठया पुलाच्‍या बांधकामाला केंद्रीय मार्ग निधीतुन मंजुरी*

दि 22/4/201 ==शिवाजी सेलोकर
*आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत*

*आ. मुनगंटीवार यांनी मानले केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे आभार*

विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर जिल्‍हयातील पोंभुर्णा तालुक्‍यातील जुनगांव – देवाडा बुज- नांदगांव – थेरगांव –देवाडा खुर्द – पोंभुर्णा – घनोटी – उमरी – कवडजई फाटा ते किन्‍ही – येनबोडी रस्‍त्‍यावर 24 कोटी 76 लक्ष रू. किमतीच्‍या मोठया पुलाच्‍या बांधकामाला केंद्रीय मार्ग‍ निधीतुन मंजुरी देण्‍यात आली आहे. केंद्रीय भुप़ष्‍ठ परिवहन तथा राजमार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी दि. 18 एप्रील 2021 रोजी आ. मुनगंटीवार यांना पत्र पाठवुन सदर मोठया पुलाच्‍या बांधकामाला मंजुरी दिल्‍याबाबत कळविले आहे. सदर रस्‍त्‍याचे बांधकाम सन 2020-21 या वर्षाच्‍या केंद्रीय मार्ग निधीच्‍या नियोजनात समाविष्‍ठ करण्‍यात आले असुन राज्‍याच्‍या सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या माध्‍यमातुन हे काम करण्‍यात येणार आहे.

पोंभुर्णा तालुक्‍यातील जुनगांव – देवाडा बुज- नांदगांव – थेरगांव –देवाडा खुर्द – पोंभुर्णा – घनोटी – उमरी – कवडजई फाटा ते किन्‍ही – येनबोडी रस्‍त्‍यावर मोठया पुलाचे बांधकाम करण्‍याची मागणी या परिसरातील नागरीकांनी आ. मुनगंटीवार यांच्‍याकडे केली होती. आ. मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांचेशी याबाबत पत्रव्‍यवहार व पाठपुरावा करून ही मागणी रेटली. त्‍यांच्‍या प्रयत्‍नांच्‍या फलस्‍वरूप सदर पुलाच्‍या बांधकामासाठी केंद्रीय सडक परिवहन मंत्रालयाने मंजुरी दिल्‍याने या पुलाच्‍या बांधकामाचा मार्ग सुकर व सुलभ झाला आहे. विकासासंबंधी किंवा लोकहिताच्‍या कोणत्‍याही कामासंदर्भात मी जेव्‍हाही नितीनजी गडकरी यांच्‍याकडे मागणी केली असता त्‍यांनी नेहमीच प्रेमपुर्वक प्रतिसाद देत ती मागणी पुर्ण केली आहे. त्‍यामुळे मी त्‍यांचा कायम त्रणी आहे, अशी भावना व्‍यक्‍त करत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नितीनजी गडकरी यांचे आभार व्‍यक्‍त केले आहे.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *