कोरोना रुग्णांच्या सोयी सुविधांसाठी हंसराज अहीर यांनी दिला जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणा

By : shivaji Selokar 

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचे वाढते संक्रमण हि चिंतेची बाब बनली असून कोरोनाच्या रुग्णांना बेड, ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर करिता वणवण करावी लागत आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय व्यवस्था कोलमडली असतांना रुग्णांचे तसेच त्यांच्या परिवाराचे हाल होत आहे. कोरोनाची दुसरी लाट हि गंभीर स्वरूपाची असून सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण पसरत आहे असे सांगतांना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील वैद्यकीय व्यवस्था अधिक प्रबळ करून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आवश्यक ती योग्य सुविधा करण्याची मागणी घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोरोना काळ नियमांचे पूर्णतः पालन करीत स्वतः धरणे दिले.

सदर धरणे आंदोलनाच्या माध्यमातून हंसराज अहीर पुढील मागण्या जिल्हा प्रशासनासमोर मांडणार आहेत –
– चंद्रपूर शासकीय महाविद्यालय महिला रुग्णालयात सेंट्रल ऑक्सिजन सिस्टम, व्हेंटिलेटर, आयसीयू च्या व्यवस्थेसह ४०० बेड उपलब्ध असतांना ते त्वरित सुरु करावे.
– डॉक्टर्सची कमी सेवाभावी आयएमए शी चर्चा करून फिजिशियन, MBBS डॉक्टर्सची गरज आहे ती विनंतीवर मागणी करून सहकार्य घ्यावे.
– जिल्ह्यातील प्रमुख शहरातील चंद्रपूर महानगरासह खाजगी रुग्णालये बालरोग रुग्णालयासह अधिग्रहित करावे.
– वेकोलिचे माजरी, घुग्घुस, बल्लारपूर चे ३ हॉस्पिटल कोविड १९ साठी त्वरित अधिग्रहित करावे.
– लालपेठ हॉस्पिटल वेकोलिचे सामान्य रुग्णालयातील एक विभाग शिफ्ट करून त्याजागी कोविड १९ चे बेड वाढवा.
– रेमडेसिवीर इंजेक्शन ची कमतरता भासणार नाही अधिक मागणी करून उपलब्ध करून घ्यावे.
– जेष्ठ डॉक्टरांसह BAMS / BHMS व अन्य प्रॅक्टिशनर डॉक्टर्सना कोविड १९च्या सेवेकरिता मदत घ्यावी.
– होम आयसोलेट परिवार व रुग्णांसाठी खोल्यांची अडचण पाहता मंगल कार्यालये, वसतिगृह, शाळा अन्य अधिग्रहण करून गरीब कुटुंबाना व्यवस्था करून घ्यावी. महानगर पालिकेने यात पुढाकार घ्यावा.

प्रबळ आरोग्य सेवा हे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांचा मूलभूत अधिकार असतांना जिल्हा प्रशासनाने सामान्य नागरिकांना त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या व वैद्यकीय सेवा सुदृढ करावी. प्रत्येक रुग्णाला योग्य ती वैद्यकीय सेवा मिळालीच पाहिजे जेणेकरून जिल्ह्यातील भीतीचे वातावरण कमी होत रुग्णसंख्या आटोक्यात येऊन जिल्ह्याची कोरोनमुक्ती कडे वाटचाल होईल असे यावेळी अहीर यांनी सांगितले. येत्या काही दिवसात जनहितार्थ केलेल्या मागण्या पूर्ण न झाल्यास मोठे आंदोलन उभारण्याचे संकेत सुद्धा यावेळी हंसराज अहीर यांनी दिले.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *