^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^दि 16/4/2021 by shankar tadas
गडचांदूर — सर्वी कडे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रशासना पुढे मोठे आव्हान उभे झाले आहे.शासन स्तरावरून सर्वी कडे कोरोना लसीकरण केंद्र उभारले असून सर्वं प्रथम 45 वर्षां पुढील नागरिकांना व कोरोना योद्धा जसे पोलीस, डाँक्टर, नर्स,सफाई कामगार,शिक्षक इत्यादी कोरोना योद्धा करिता ऑनलाइन मध्ये “फ्रंट लाईन अप्शन” होते. व तेव्हा कोरोना योद्धा ना कुठलीही वयाची मर्यादा नव्हती.त्यावेळेस बरेचशे कोरोना योद्धने लसीचा लाभ घेतला.अजूनही काही फ्रंट लाईन कोरोना योद्धा लस घ्यायचे आहे .व आता 45 वर्षा वरील व्यक्तींना कोरोना लसीकरण देण्यात येत आहे.परन्तु पूर्वी काही 45 आतील वयोगटातील कोरोना योद्धानी लसीकरण घेतले नाही.आता घेण्याकरीता गेले असता त्यांना ऑनलाइन नोंदणी करिता “फ्रंट लाईन अप्शन”पूर्वी होते ते 5 एप्रिल पासून बंद केले असल्याने त्या कोरोना योद्धाना लसी पासून वंचीत राहावे लागत आहे.व आता परत कोरोनाने डोके वर काढल्याने परत या कोरोना योद्धाला आपल्या जीवाची पर्वा नकरता रात्र न दिवस काम करावे लागत आहे.तेव्हा या योद्धा करिता ” फ्रंट लाईन अप्शन”ऑनलाईन नोंदणी करिता उपलब्ध करून त्याची काही काळाकरिता मुदत वाढवून देण्यात यावी जेणेकरून काही वंचित राहिलेले कोरोना योद्धा यांना लसीकरणाचा लाभ घेता येईल अशी मागणी गडचांदूर भाजपाच्या वतीने कोरपना तालुका आरोग्य अधिकारी यांचे मार्फत मा. जिल्हाधिकारी यांना निवेदनातुन केली आहे.यावेळी गडचांदूर शहर भाजपा अध्यक्ष सतीश उपलेंचवार,जिल्हा भाजपा कार्यकारणी सदस्य तथा माजी संजय गांधी निराधार अध्यक्ष कोरपना मा संजयभाऊ मुसळे,भाजपा नेते निलेश ताजने,नगरसेवक अरविंद डोहे,नगरसेवक रामसेवक मोरे,माहेशजी घरोटे आदी उपस्थित होते.