गुढीपाडव्या पासुन मोफत मास्क वाटप करून अभियान चालवणार – हंसराज अहीर*
By : Shivaji Selokar
चंद्रपूर:- देशात एक वर्षापासुन कोरोना संकटाशी आम्ही सामना करीत आहो जगाच्या तुलनेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आपण फार मोठे यश प्राप्त केले होते. प्रभाव कमी होत असतांनाच अचानक पुन्हा कोरोनाचा प्रकोप वाढलेला आहे. या स्थितीवर मात करण्याकरीता प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी सरकारने अनेक उपक्रम राबवले जनहितार्थ काम करतांना प्रधानमंत्री महोदयांनी मास्क वापरण्याचा, सामाजिक अंतर ठेवण्याचा व हात स्वच्छ करण्याकरीता वारंवार आवाहन केले असे असतांना आम्हाला पुन्हा मा. मोदीजींच्या आवाहनाला तथा तज्ञांच्या सुचनेप्रमाणे मास्क लावने आवश्यक आहे. सुदैवाने आपल्या देशात व्हॅक्सीनचा शोध लागला त्यावर फार फार मोठ्या प्रमाणात व्हॅक्सीन चे कार्य चालु आहे. तरी आपल्या सर्वांना सावध रहावेच लागणार असे तज्ञांचे म्हणने आहे. मास्क वापरने अनिवार्य असल्याने मास्कला आम्ही व्हॅक्सीन समजावे. मास्क शिवाय राहणे स्वतःशी धोका आहे तसेच दुसÚयांना पण धोका आहे. या भावना व तज्ञांचे मत घेवून केंद्र सरकारने प्रधानमंत्री मोदीजी वारंवार मास्क लावण्याकरीता आवाहन करतात.
मास्कची गरज गांभीर्याने घेवून चंद्रपूर जिल्ह्यात तथा लोकसभा क्षेत्रात ‘‘माझा मास्क, माझे व्हॅक्सीन’’ असे जनजागरण अभियान 13 एप्रिल रोजी गुढीपाडव्यापासुन कस्तुरबा मार्गावरील भाजपा जनसंपर्क कार्यालयात भाजपा पदाधिकारी व जनप्रतिनीधींच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात येत आहे. सर्वांनी आपआपल्या ठिकाणी आपल्या परिवारामध्ये सर्वांसाठी मास्कचा वापर अनिवार्य करण्याची वेळ आली आहे. म्हणुन हे अभियान चालवितांना मास्कचे वाटपही करण्यात येईल. नागरीकांनी या अभियानाला प्रतिसाद द्यावा. प्रधानमंत्री नरेंद्र मादीजी व तज्ञांनी मास्क संबंधी केलेले आवाहन तथा सुचनांचे पालनही करावे असे पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आवाहन केले आहे.