पाच मुलांच्या आईचा अखेर ‘बेवारस’ मृत्यू !

By : Shankar Tadas
आई शब्द ऐकण्यासाठी प्रत्येक महिला जणू हृदयाचा कान करून असते. त्यापेक्षा अन्य सुख तिला अगदी तुच्छ वाटू लागते. स्वतःच्या सुखदुःखाचा तिला विसर पडतो. अशी एकरूपता फक्त तिलाच साधते. मुलांचे संगोपन करताना तिने आपले भविष्यच नव्हे तर जीवाचीही पर्वा केलेली नसते. अशाच एका पाच अपत्य असलेल्या आईचा शहरातील एका झोपडीत बेवारस मृत्यू व्हावा..!!
वरोरा येथील नेहरू चौकात जुन्या टुरिंग टॉकीजजवळ जगदीश खोब्रागडेचे कुटूंब होते. चार मुले, एक मुलगी. जगदीशचे अकाली निधन झाले. नंतर त्याची पत्नी द्रौपदी पाच चिल्लेपिल्ले घेऊन गुजराण करू लागली. ती चौकात फळे विकायची. पोरांना पंख फुटली. एक, एक उडून जाऊ लागले. एक मुंबईला राहतो. एकाने आत्महत्या केली. एक दिव्यांग अंकुश (वय 50 )राहिला होता तिच्या आधाराने. आता पैलतीर दिसत असतानाही दिव्यांग मुलाला सोडून जायची हिम्मत होत नव्हती. एकमेकांच्या आधाराने राहणाऱ्या या मायलेकांचा कधी मृत्यू झाला कोणालाच कळले नाही. 10 एप्रिल रोजी दुर्गन्धी पसरली तेव्हा कळले. नंतर ते कोरोना पॉझिटिव्ह म्हणून शासकीय पद्धतीने अंत्यविधी पार पडला. 85 वर्षीय महिलेचा ऐन शहरात असा बेवारस मृत्यू संवेदनशील समाज जिवंत असल्याचे लक्षण म्हणावे काय??

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *