आमदार सुभाष धोटे यांनी घेतला कोरपना तालुक्यातील पाणी टंचाई नियोजनाचा आढावा.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी १ लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वितरण.

By : Mohan Bharti 

कोरपना – उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणी टंचाईस सामोरे जावे लागते. पंचायत समिती कोरपना अंतर्गत येणाऱ्या सर्व गावात पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू राहावा, यासाठी योग्य नियोजन आणि अमलबजावणी करून नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात यावा अशा सुचना आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. मंगळवारी कोरपना तहसील कार्यालयाच्या सभागृहात पाणीटंचाईची बैठक पार पडली.
तालुक्यातील ११९ गावातील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. कोरोना नियमाचे पालन करून पाणीपुरवठा करण्यासंदर्भात अडचणी आमदारांनी जाणून घेतल्या. याप्रसंगी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते सन २०२०-२०२१ या वर्षात आत्महत्याग्रस्त शेतकरी पात्र लाभार्थी चंद्रकला मोतीराम तोडासे रा. कोठोडा बु. तसेच सविता मंगेश तिखट रा. निमनी यांना प्रत्येकी १ लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी उपसभापती सिंधुताई आस्वले, जिल्हा परिषद सदस्या कल्पना पेचे, विनाताई मालेकर, जि. प. सदस्य शिवचंद्र काळे, माजी सभापती श्‍याम रणदिवे, माजी उपसभापती संभा कोवे, तहसीलदार महेंद्र वाकलेकर, उत्तम पेचे, सुरेश मालेकर, प्रा. आशिष देरकर, अभय मुनोत, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष उमेश राजुरकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे, नायब तहसिलदार चिडे, सहायक उपअभियंता दराडे, सहभियांता विद्युत विभाग इंदूरकर, कोरपना तालुक्यातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *