*माजी आमदार अँड संजय धोटे यांची आदिवासी अतिदुर्गम भागातील गावांना भेटी

 

 

 

आमदार कार्यकाळात पूर्ण व सुरू असलेल्या कामाची केली पाहणी

By : Shivaji Selokar

कोरपणा तालुक्यातील अतिदुर्गम भागात माजी आमदार अँड संजय धोटे यांनी गावागावात जाऊन भेटी देऊन आदिवासी बांधवांशी संवाद साधला,थीप्पा,मंगलहिरा, उमरहीरा,या गावांना भेटी देऊन आदिवासी बांधवाच्या समस्या जाणून घेतल्या,थीप्पा येतील पुरातन हनुमान मंदिर येथे भेट देऊन अर्धवट असलेल्या बांधकामाची पाहणी करून माहिती घेतली,यावेळी ग्रामस्थांनी माजी आमदार अँड धोटे यांचे जंगी स्वागत करून त्यांना मंदिरापर्यंत वाजत गाजत स्वागत केले,

अर्थवट असलेल्या मंदिराचे बांधकाम करण्यासाठी यावेळी सहकार्य करण्याची यावेळी त्यांनी सांगितले,तसेच आपल्या आमदारकीच्या कार्यकाळ या भागात विकासकामाला भरघोस निधी उपलब्ध करून दिला होता,अश्या कामांना भेट देऊन थीप्पा ते तेलंगणासीमा,दुर्गाडी फाटाते शिवापूर,उमरहिरा ते रुपापेठ रोडची पाहणी केली, तसेच मांगलहिरा पाणीपुरवठा विहिरीला भेट दिली.यासंदर्भात गावकरी नागरिकांची समस्या जाणून घेतली,

उमारहिरा येथील भारतीय जनता पक्षाचे श्री.भीमराव गेडाम यांचे वडील अल्पशा आजाराने निधन झाले त्याच्या घरी भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन केले,यावेळी भाजपाचे अनिल कवरासे,ज्योती राम कोहाचाडे, भारत सोयाम,मलकू तुमराम,लक्ष्मण मडावी,व गावातील ईतर समाज बांधव व आदिवासीं बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *