पराकोटाच्या 100 मीटर पेक्षा आतील बांधकामाकरीता महानगरपालिकेने पुरातत्व विभागाच्या प्रादेशिक संचालकांची परवानगी घ्यावी केंद्रीय मंत्र्यांचे पत्र

शिवाजी सेलोकर
चंद्रपूर:- केंद्रिय पुरातत्व विभागाने चंद्रपूर महानगरातील ऐतिहासीक परकोटापासून 100 मी पर्यंत कोणत्याही बांधकामास प्रतिबंध घालत परवानगी नाकारली असल्याने स्थानिक नागरीकांना त्यांच्या घरांचे किंवा अन्य प्रयोजनार्थ असलेल्या वास्तूंचे बांधकाम करण्यास अडचण निर्माण झाल्याने पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी याप्रश्नी तातडीने दखल घेत पुरातत्व विभागाच्या या अन्यायी नियमात बदल करुन परकोटा बाबतीतील ही मर्यादा 100 मी ऐवजी 9 मी करण्यात यावी याकरीता केंद्रीय संस्कृती व पर्यटन राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांचे सोबत व्यक्तीशः चर्चा करुन हा प्रश्न सोडवावा असे सूचविले होते. त्यानुसार केंद्रीय मंत्र्यांनी हंसराज अहीर यांना पाठविलेल्या दिलासादायक पत्राच्या अनुशंगाने हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असा आशावाद अहीर यांनी व्यक्त केला आहे.
चंद्रपूर शहराचा परकोट 10 कि.मी. लांबीचा आहे. त्यामुळे त्याची श्रेणी बदलवून परवानगी घ्यावी. परकोटाला ऐतिहासिक मंदीर किवा वास्तु एवढे महत्व न देता परकोट हीे एक संरक्षण भींत असल्याने मंदीर, राजवाडा असा भाग मानु नये ज्या परकोटामुळे नागरीकांपुढे बांधकाम विषयक प्रश्न उद्भवला आहे अनेक नागरीकांना जुन्या घरांची दुरूस्ती करावयाची आहे. भविष्यात या घरांमुळे कुटूंबियांना धोका उद्भवू शकतो तसेच पूर्वीच्या काळात राजवाड्यापासून अनेक इमारती परकोटालगतच आहेत यासारख्या बाबी मंत्र्यांच्या निदर्शनास आणुन देण्यात आल्या होत्या.
या सर्व बाबींची दखल घेत केंद्रीय संस्कृती व पर्यटन राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी पूर्व केंद्रीय मंत्री अहीर यांना पाठविलेल्या पत्राव्दारे कळविले आहे की, प्राचिन स्मारक किंवा पुरातत्व स्थळाच्या 100 मीटर प्रतिबंधीत क्षेत्राच्या आत किंवा 200 मीटर नियंत्रित (रेग्युलेटेड) क्षेत्रात बांधकाम किंवा अन्य विकासकामे करावयाची असल्यास प्रादेशिक संचालक मुंबई किंवा राष्ट्रीय स्मारक प्राधीकरणाकडे स्थानिक महानगरपालिका प्रशासनाने परवानगी घ्यावी असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिय महानगर प्रशासनाने चंद्रपूर महानगरातील नागरीकांच्या संरक्षीत व नियंत्रित क्षेत्रालगतच्या वर्षानुवर्षे अडकुन पडलेल्या बांधकामाचा, विकासकामांचा प्रश्न स्वतः पुढाकार घेवून पुरातत्व विभागाच्या यंत्रणेकडुन परवानगी घेवून सोडवावा अशी पत्राव्दारे सुचना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आयुक्त मनपा यांना केली आहे.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *