!! माणीकगड सिमेंट कम्पनिच्या डस्ट प्रदूषण बाबत नगरपरिषदने ठराव घ्यावा

!! ठराव न घेतल्यास नगर परिषद समोर ठिय्या आंदोलन करनण्याचा साईशांती नगरवासींचा ईशारा !!

गडचांदूर : मागील एक वर्षा पासून माणिकगड सिमेंटच्या डस्ट प्रदूषनामुळे साईशांती नगरातील जनता हैराण झाली आहे.हे नगराध्यक्ष व सत्ताधारी लोकप्रतिनिधी उघड्या डोळ्यांनी पाहून बघ्याची भूमिका घेत आहे.मागील तीन महिन्या पूर्वी दिनांक 26/12/2020 रोजी माणिकगड सिमेंट कम्पनिकडून मोठ्या प्रमाणात डस्ट प्रदूषण होत असल्या बाबत ठराव घेण्याबाबत निवेदन दिले.परंतु जनतेच्या निवेदनाला केराची टोपली दाखविली.
व मागील वेळेस सभेत विषय घेतला नाही.त्यामुळे आम्ही सर्व साईशांती नगरातील महिलांनी आज परत मा. नगराध्यक्ष,मुख्याधिकारी, उपाध्यक्ष तथा सर्व सन्माननीय सभापती, नगरसेवक,नगरसेविका यांना आज निवेदन देऊन होत असलेले डस्ट प्रदूषणा बाबतचा ठराव विषय सूचित घ्या व बहुमताने ठराव मंजूर करा अन्यथा आम्ही सभेच्या दिवशी नगर परिषद च्या समोर बसून आंदोलन करू अश्या प्रकारचे निवेदन दिले आहे.सदरचे निवेदन देण्यास गेले असता नगर परिषद मध्ये नगराध्यक्ष हजर नव्हते व मुख्याधिकारी यांनी सकारात्मक उत्तर देत येणाऱ्या सभेत विषय ठेवते आपण नगराध्यक्ष यांना भेटा असे उत्तर दिले.जर का या सभेत विषय ठेवला नाही वा ठराव मंजूर करण्यास टाळाटाळ केल्यास आम्ही नगर परिषद समोर आंदोलन करणार असल्याचे नमूद केले.
यावेळी साईशांती नगरातील रहिवासी माजी नगराध्यक्ष सौ विजया डोहे,लताताई ठावरी, मनीषा इसनकर, कल्पना जोगी,शारदा क्षीरसागर,प्रभा पाणघाटे,माधुरी रासेकर, प्रीती मिननेवार, सुवर्णा कावटकर ,वैशाली पोतनूरवार,आशा आत्राम,रिना अलोने, वर्षा आत्राम, अनुसया गायकवाड,शालू टोंगे इत्यादी महिला उपस्थित होत्या आतातरी डस्ट प्रदूषण चा ठराव नगर परिषद च्या सभेत घेतील का? नाही ? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *