नांदेड : हल्लाबोल मिरवणूक:एसपींसह अन्य अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडल्या, सहा गंभीर

By : Mohan Bharti

नांदेड : शिख समाजात होळी या सणाला मोठे महत्व आहे. त्यानिमित्त शिख समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात दरवर्षी हल्लाबोलची मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षी कोरोना संसर्गाचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊन लावण्या आले आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्या वतीने कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला परवानगी देता येणार नाही असा आदेश यापूर्वीच काढला होता. मात्र या आदेशाची पायमल्ली करत हल्लाबोल मिरवणुकीतील काही तरुणांनी परवानगी का नाकारली म्हणून चक्क पोलिसांच्या दिशेने तुफान दगडफेक केली. यात सहा पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून पोलिस अधीक्षक यांच्या वाहनांसह अन्य वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या गाड्यांचे प्रचंड नुकसान करण्यात आले आहेत. शहरात या प्रकरणानंतर तणावाचे वातावरण बनले असून हल्लेखोरांची धरपकड सुरु आहे. सध्या शहरात तणावाचे वातावरण बनले असून वजिराबाद पोलिस ठाण्यात या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

विनापरवानगी हल्लाबोलची मिरवणूक काढून संतप्त शिख तरुणांनी चक्क पोलिसांच्या गाड्यांवर तुफान दगडफेक करत सहा पोलिस जखमी झाले आहेत. एवढेच नाही तर पोलिस अधीक्षकांच्या शासकिय गाडीसह अन्य पोलिस अधिकाऱ्यांच्या गाड्यांनाही लक्ष करण्यात आले आहे. पोलिस विभागाकडून धरपकड सुरु असून सध्या वजीराबाद परिसरात तणावाचे वातावरण बनले आहे. हा प्रकार सायंकाळी सहाच्या सुमारास गुरुद्वारा परिसरात घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने सोमवारी (ता. २९) हल्लाबोल मिरवणूक होळीनिमित्त काढण्यात येते. परंतु जिल्हा प्रशासनाने त्यांनी मिरवणूक काढू नये, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने काळ कठीण आहे. त्यामुळे शीख समाजाने प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती केली होती. परंतु गुरुद्वाराच्या वतीने परवानगी नसतानाही जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पायदळी तुडवत हल्लाबोलची मिरवणूक काढली. एवढेच नाही तर संतप्त शीख युवकांनी रस्त्यावर लावलेले बॅरिकेट्स तोडून टाकले, हातात नंग्या तलवारी घेऊन शहरात प्रचंड दहशत निर्माण केली. शेवटी पोलिस प्रशासनाकडून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला असता चक्क त्यांच्यावरच हल्ला करण्यात आला. यात एसपीचे अंगरक्षक श्री. दिनेश पांडे, अजय यादव यांच्यासह सहा ते सात पोलिस गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या हल्ल्यात स्वत: एसपी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, वजिय कबाडे, पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, संदीप शिवले या हल्ल्यात बचावले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी डाॅ विपीन यांनीही भेट दिली. हल्लेखोरांनी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलिस निरीक्षक यांच्यासह वाहनांची प्रचंड नासधुस केली. टायरमधील हवा सोडली, काचा फोडल्या. सध्या या परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांकडून धडपडीचे काम सुरु आहे. या प्रकरणात सध्या कुठलाही गुन्हा दाखल नसून या भागात तणावाचे वातावरण बनले आहे. पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी सांगितले.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *