कूलरचा करंट लागून महिलेचा दुर्दैवी अंत

कोरपना तालुक्यातील उपरवाही येथे सोनु सत्यपाल पिंगे (वय 22) या महिलेचा कूलरला करंट लागून मृत्यू झाला. आज, 27 मार्चला सकाळी दहा वाजता फरशी पुसत असताना कूलरच्या स्टॅन्डला हात लागल्यामुले तिला विजेचा धक्का बसला. शेजारच्या लोकांनी त्वरित मेन स्विच बंद केला. मात्र सोनू बेशुद्ध पडली होती. काही वेळातच तिचा मृत्यू झाला. कालच तिच्या दोन वर्षीय मुलाचा वाढदिवस होता. त्यानिमित्त आईवडील व इतर नातलग आले होते. मृतक महिलेचा पती सत्यपाल पिंगे अंबुजा सिमेंट कंपनीत नोकरीला आहे. महिलेच्या दुर्दैवी मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. गडचांदूर पोलिस स्टेशनमध्ये महिलेच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आहे.

*****

ताटीचे कूलर धोकादायक !!

लोखंडी फ्रेम आणि पाण्याचा वापर यामुळे अशा कूलरला वीज धक्का लागण्याची शक्यता अधिक असते. याबाबत बऱ्याच लोकांना अज्ञान किंवा हलगर्जीपणा असल्यामुळे योग्य वापर होत नाही. प्रसंगी दुर्दैवी घटना घडतात. कित्येक लोक मृत्यूमुखी पडतात. यात महिला व लहान मुले अधिक असतात.
असे कुलर घरी लावतानाते सुरक्षित असल्याची खात्री जाणकार मिस्त्रीकडून करून घ्यावी. योग्य अर्थिंग असेल तर अशा घटना टाळू शकतो.

सावधान.. !! सावधान.. !!

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *