गडचांदूर : -23/ 3/2021मोहन भारती
भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी झालेल्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांविरुद्ध लढताना भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, यांनी बलिदान दिले,23 मार्च 1931 ला फासावर चढविले, हा दिवस संपूर्ण भारतात शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो,
स्थानिक महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय येथे शहीद दिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानि मुख्याध्यापक कृष्णा बततुलवार होते,प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याध्यापीका प्रा,सौ,स्मिता चिताडे,उपप्राचार्य प्रा विजय आकनूरवार,पर्यवेक्षिका श्रीमती शोभा घोडे,एम,सी,व्ही, सी,विभाग प्रमुख प्रा, अशोक डोईफोडे, होते.सर्वप्रथम शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली पर्यवेक्षिका शोभा घोडे यांनी शहीद भगतसिंग, राजगुरू,सुखदेव यांच्या स्वातंत्र्य चळवळीत असलेल्या योगदानाबद्दल माहिती दिली.याप्रसंगी ,विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय चे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.संचालन तथा आभार प्रदर्शन श्रीमती शोभा घोडे यांनी केले.