!!अरविंद डोहे भाजपा नगरसेवक तथा साईशांती नगरवासी कडून आंदोलनाचा ईशारा !!
*By Shankar Tadas
गडचांदूर – मागील एक ते दिड महिन्या पासून माणिकगड सिमेंट कँपणीच्या विरोधात साईशांती नगरातील नागरिकांनी डस्ट प्रदूषणा बाबत शासन/प्रशासन कडे निवेदन दिले.परन्तु या मुजोर कम्पनी विरोधात कोणत्याही अधिकाऱ्याने चौकशी करण्याची तथा कार्यवाई करण्याचे धाडस दाखविले नाही.उलट कम्पनिकडून थट्टा करण्यासारखे डस्ट प्रदूषणात लक्षणीय वाढ करीत असल्याचे दिसते.
तेव्हा शासन ,प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजप
नगरसेवक अरविंद डोहे व साईशांती नगर वासी तर्फे आज कम्पनी विरोधात तसेच स्थानिक प्रदूषणा विरुद्ध निषेध मोर्च्या काढून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गडचांदूर येथील राजीव गांधी चौकात भव्य पुरुष,युवक,महिला सह निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यात विशेष करून मोठ्या संख्येत महिला ,युवकांनी सहभाग दर्शविला.व काळे कपडे परिधान केले.घरावर काळे झेंडे लावण्यात आले.व दारावर माणिकगड सिमेंट कम्पनीचा निषेध बॅनर लावण्यात आले. मुख्य रस्त्यावर “माणिकगड सिमेंट कँपणीच्या सौजन्याने प्रदूषित शहरात आपले सहर्ष स्वागत” बॅनर लावण्यात आले.सर्व निवेदन न्यूज पेपर व प्रदूषणाचे फोटो टाकून कपणीचा निषेध बॅनर लावण्यात आले.सर्व महिला पुरुष,युवकांनी आपल्या व्हाट्सअप वर टेटस् ,डीपी ठेवून निषेध नोंदवला.
या वेळी भाजपाचे शहर अध्यक्ष सतीश उपलेंचिवार, तसेच शिवसेना नगरसेवक सागर ठाकुरवार यांनी सुद्धा साईशांती नगरवासी सोबत आहो आम्हच्या पक्ष्याचा पूर्णपणे पाठिंबा असल्याचे जाहीर केले.नगरसेवक अरविंद डोहे,निलेश ताजने,न्यूतेश डाखरे, रवींद्र चौथाले,महेंद्रजी ताकसांडे,माजी नगराध्यक्ष सौ डोहे,सौ माधुरी ठावरी, स्मिता पिदूरकर,यांनी सदरचा निषेध हा शासन प्रशासनाचे डस्ट प्रदूषणाकडे लक्ष वेधण्या साठी आहे जर येत्या काही दिवसात सदर कम्पनी विरुद्ध कार्यवाई करून प्रदूषण बंद न केल्यास मोठे आंदोलन करू असा सूचक इशारा दिला.
तेव्हा या माणिकगड सिमेंट कम्पनी विरुद्ध शासन प्रशासन काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.