महिलांना मिळणार घरबसल्या रोजगार
नुकतेच साधुराम गार्डन मोशी पुणे येथे स्वरूप फाऊंडेशन अंतर्गत महिला उद्योग मेळावा पार पडला हा मेळावा सकाळी ११ वाजता चालू होऊन ३ वाजता संपन्न झाला यामध्ये स्वरूप फाऊंडेशनचे फाऊंडर प्रशांत सस्ते यांनी महिलांना स्वतःचे कुटुंब सांभाळून रोजगार निर्मिती कशी होऊ शकते याचे मार्गदर्शन केले तसेच स्वरूप फाउंडेशन अंतर्गत महिलांसाठी भाजी भाकरी केंद्र, कापडी पिशव्या शिवणे, रोपटे तयार करणे, पॅकेजिंग अश्या बऱ्याच घरगुती उद्योगांमधून महिलांना उत्पन्नाचा मार्ग तयार करून दिला जातो याबद्दल माहिती सांगितली.
त्याचबरोबर महिलांनी स्वरूप फाऊंडेशनचे फाऊंडर प्रशांत सस्ते यांना घरी बसून आम्हाला उत्पन्न मिळू शकते का? तसेच रोज फक्त २ ते ३ तास काम करून आम्ही चांगले उत्पन्न घेऊ शकतो का ? असे अनेक प्रश्न विचारले आणि त्या सर्व प्रश्नांचे निरासन प्रशांत यांनी केले आणि महिलांच्या मदतीसाठी स्वरूप फाऊंडेशन कायम तत्पर असेल याची ग्वाही सुद्धा दिली. या मेळाव्यात महिलांनी उपस्थित राहून उस्फूर्त प्रतिसाद नोंदविला या मेळाव्यास संपूर्ण पुण्यामधून महिलांनी उपस्थिती नोंदविली यामध्ये प्रियांका मधाले, विद्या गोवेकर, प्रतिक्षा पाटील अश्या बऱ्याच महिलांनी आपले मत व्यक्त करून स्वरूप फाऊंडेशन महिलांसाठी रोजगारनिर्मिती करत असल्यामुळे त्यांचे मनापासून आभार मानले.
©शुभम शंकर पेडामकर