चंद्रपूर:- कर्नाटक पाॅवर कार्पोरेशन लिमी. च्या बरांज खुल्या कोळसा खाणीशी निगडीत प्रकल्पग्रस्त व स्थानिक कामगारांच्या प्रलंबित प्रश्न व समस्यांच्या निवारणार्थ जिल्हा प्रशासन, केपीसिएल प्रबंधन व प्रकल्पग्रस्तांची संयुक्त बैठक घेण्याची सुचना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली होती. सदर सुचनेनुसार दि. 15 मार्च 2021 रोजी दु. 03.00 वा. वीस कलमी सभागृहात या अनुषंगाने आढावा सभा आयोजित करण्यात आली आहे.
ही सभा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे. या सभेमध्ये केपीसिएल प्रबंधनाचे वरिष्ठ अधिकारी, प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनीधी तसेच प्रकल्पग्रस्त शेतकरी व स्थानिक कामगार प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. या बैठकीच्या माध्यमातून बरांज खाणीशी संबंधीत विविधांगी प्रश्नांची सोडवणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.