लोकदर्शन प्रतिनिधी : शिवाजी सेलोकर
गडचांदूर :- कोरपना, व जिवती या दोन्ही तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या औद्योगिक शहर गडचांदूर ला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा यासाठी गडचांदूर तालुका संघर्ष समिती च्या वतीने आमदार सुभाष भाऊ धोटे यांना निवेदन देण्यात आले,
गडचांदूर तालुका निर्मिती ची मागणी गेल्या काही वर्षापासून सातत्याने केली जात आहे, यासाठी संघर्ष समिती च्या वतीने अनेकदा आंदोलने केली, शासनाने सुद्धा याबाबत प्रस्ताव तयार केला आहे, गडचांदूर तालुका निर्मिती ला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना ,पत्रकार संघाने समर्थन दिले आहेत,
गडचांदूर हे शहर तालुका च्या दृष्टीने शासनाचे सर्व निकष पूर्ण करीत आहेत, गडचांदूर पेक्षा अतिशय लहान शहराला तालुक्याचा दर्जा मिळाला आहेत,केवळ राजकीय पाठबळ नसल्याने तालुका निर्मिती ला अडथळा निर्माण होत आहेत, तेव्हा शासनाने आता तरी गडचांदूर शहराला तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी संघर्ष समिती चे संघटक उद्धव पुरी,अशोककुमार उमरे,डॉ, के,आर,भोयर, प्रा डॉ हेमचंद दूधगवली, तुळशीरामजी भोजेकर, शेख अहमद,इत्यादीनी मुख्यमंत्री यांना राजुरा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या मार्फत निवेदनाद्वारे केली आहेत,याप्रसंगी ,राजुरा नगर परिषदेचे अध्यक्ष अरुण धोटे,गडचांदूर नगर परिषदेच्या अध्यक्षा सविता टेकाम,तालुका काँग्रेस चे अध्यक्ष विठ्ठलराव थिपे, पोलीस निरीक्षक गोपाल भारती, नगरसेवक,गटनेते विक्रम येरणे,पापय्या पोन्नमवार,शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संतोष महाडोळे, तथा इतर उपस्थित होते,