*काँग्रेस नगरसेवक महेश भर्रे यांना तीन दिवसांत अटक करा.अन्यथा तीव्र आंदोलन करू.*

लोकदर्शन प्रतिनिधि : शिवाजी सेलोकर

*भाजपा ब्रह्मपुरीचा पोलीस विभागाला इशारा.*

*उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन.*

ब्रह्मपुरी १३/०३/२१ :

ब्रह्मपुरी येथील काँग्रेसचे नगरसेवक महेश भर्रे यांच्या राहत्या घरून मुंबई उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने (Excise) धाड टाकली असता कारवाईत उत्पादन शुल्क वसुली पथकाने नगरसेवक महेश भर्रे यांच्या राहत्या घरून शंभर पेट्या दारू जप्त केली, सोबत एक चार चाकी वाहन सुद्धा जप्त करण्यात आले. मात्र अद्याप नगरसेवक महेश भर्रे यांना अटक करण्यात आलेली नाही. महेश भर्रे यांना ताबडतोब अटक करावी, नगरसेवक महेश भर्रे यांच्या अटकेची मागणी करत भारतीय जनता पार्टी ब्रह्मपुरी च्या वतीने ब्रह्मपुरी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तीन दिवसात नगरसेवक महेश भर्रे यांना अटक न झाल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू असा इशारा ही विभागीय पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आला.

मागील अनेक दिवसांपासून महेश भर्रे हे अवैध दारू विक्री करत आहेत. सहा महिन्यापूर्वी महेश भर्रे यांची एक ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग सुद्धा व्हायरल झाली होती. त्यामध्ये त्यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार व ब्रह्मपुरी चे तत्कालीन पोलीस ठाणेदार खाडे यांच्या नावाचा उल्लेख करत यांच्यासाठी व यांच्या मदतीने आपण हे काम करतो असे संवादात म्हटले आहे. एवढा मोठा पुरावा हाती असताना देखील पोलीस विभागामार्फत कोणत्याही प्रकारची कारवाई तेव्हा करण्यात आली नव्हती.

या सोबतच ब्रह्मपुरी येथे अवैध दारू विक्री सह सट्टापट्टी, कोंबडा बाजार, रेती तस्करी यावरही पोलीस विभागाने संबंधित विभागाच्या मदतीने ताबडतोब कारवाई करावी व ब्रह्मपुरी शहराची ओळख जी सांस्कृतिक शहर क्रीडाप्रेमींचे शहर म्हणून जी ओळख आहे, ती ओळख कायम ठेवावी अशी मागणी या वेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली. या वेळी आम्ही दोनच दिवसात नगरसेवक महेश भर्रे यांना अटक करू असे आश्वासन पोलीस उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे यांनी दिले.

याप्रसंगी ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर, भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेश कार्य सदस्य प्रा. प्रकाश बगमारे, भाजप शहर महामंत्री तथा नगरसेवक मनोज वठे, महामंत्री मनोज भूपाल, कोषाध्यक्ष अरविंद नंदुरकर, नगरसेविका पुष्पा गराडे, माजी नगरसेविका अनघा दंडवते, माजी नगरसेविका हेमलता नंदुरकर, प्राध्यापक संजय लांबे, विलास खरवडे,प्रा.अशोक सालोडकर, नाना गराडे, साकेत भानारकर, भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रा.सुयोग बाळबुधे, भाजयुमो जिल्हा सचिव तनय देशकर, महामंत्री रितेश दशमवार, महामंत्री स्वप्नील अलगदिवे, उपाध्यक्ष पवन जयस्वाल, उपाध्यक्ष अमित रोकडे, उपाध्यक्ष प्रमोद बांगरे, सचिव अन्वर शेख, मनिष पटेल, कृष्णा वैद्य, दिलीप पंडित, रेखा राऊत, प्रतिभा धोटे, रितू सेठीये, विलास सांगोलकर, विनायक दुपारे, प्रकाश कूथे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *