*वीर बाबुराव शेडमाकेंचे ‘‘शहिद स्थळ’’ सर्वांसाठी प्रेरणास्थान:- हंसराज अहीर*

 

 

*शहिदवीरांस जयंतीदिनी अभिवादन*

लोकदर्शन प्रतिनिधि : शिवाजी सेलोकर

चंद्रपूर:- 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यातील शुरवीर योध्दा असलेल्या शहिद बाबुराव शेडमाके यांचे योगदान भविष्यातील पिढ्यानपिढया कायम स्मरणात ठेवतील. मातृभुमीच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणारे चंद्रपूरचे महान सुपुत्र म्हणुन देशाच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्णक्षराने कोरल्या गेले आहे. त्यांचे शहीद स्मारक केवळ आदिवासी बांधवांसाठीच नाही तर अखिल भारतवर्षातील सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे अशा महान योध्याच्या स्मृतीस अभिवादन करून त्यांच्या कार्याला उजाळा देणे हीच खÚया अर्थाने शहीदवीरास श्रध्दांजली ठरेल अशा भावना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हेसराज अहीर यांनी व्यक्त केल्या.
स्थानिक जिल्हा कारागृहातील शहीद स्मारकास वीर बाबुराव जी यांच्या जयंती निमित्त अभिवादन करतांना दि. 12 मार्च रोजी आयोजित जयंती कार्यक्रमात शहीद शेडमाके यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील अनेक स्मृतींचे स्मरण करतांना त्यांनी सांगीतले की 2009 मध्ये आपल्या पुढाकारातून त्यांच्या जयंतीदिनी केंद्र सरकारने डाक तिकीटाचे प्रकाशन करून त्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामातील शौर्याला नमन केले होते.
गोंडकालीन राजवाडा हा कैदखाना असणे हे मोठे दुदैेव आहे तो अपमानही आहे. हा राजवाडा मुक्त व्हावा यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार एक पथक येथे येवून पाहणी करून गेले. राजवाड्याच्या ठीकाणी स्मारक बनविण्याचा निर्धार व्यक्त करून याबाबत पाठपुरावा केला जात असल्याचे हंसराज अहीर यांनी सांगीतले की ज्या पिंपळाच्या झाडावर बाबुरावजी शेडमाके यांना फासावर देण्यात आले त्या शहीद स्थळावरील पिपळाच्या झाडाचे पान प्रेरणास्थान म्हणुन प्रत्येकांनी आपल्या संग्रही ठेवले पाहीजे. शहीदवीर बाबुरावजी यांच्या शौर्याच्या इतिहासाचे पठन करून त्यांच्या राष्ट्राप्रती असलेल्या समर्पणाची व त्यागी वृत्तीची सर्वांनी प्रेरणा घ्यावी असे सांगीतले.
या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष विजय राऊत, माजी महापौर अंजर्ली घोटेकर, राजु घरोटे, विकास खटी, राजेंद्र खांडेकर, मनपाच्या महिला व बालकल्याण सभापती चंद्रकला सोयाम, नगरसेविका शिला चव्हान, माया उईके, शितल आत्राम, ज्योती गेडाम, शितल कुळमेथे, गणेश गेडाम, बाजार मंडळाचे अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार, धनराज कोवे यांचेसह आदिवासी बांधवांची उपस्थिती होती.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *