धोक्याची घंटा वाजत आहे

पारंपारिक उद्योगांपैकी ७०% उद्योग पुढील १० वर्षात बंद पडतील.

जगभरामध्ये टेक्नॉलॉजी, बाजारपेठेचे स्वरूप, संशोधन, ग्राहकांचा माइंडसेट इतक्या वेगाने बदलत आहे की आज चालणारा उद्योग, प्रॉडक्ट, ब्रॅंड उद्या चालेल का, हे सांगू शकत नाही.

मी कोणालाही कोणतातरी उद्योग पुढील काही दशके चालेल व करा, असा सल्ला देत नाही. तीन ते पाच वर्षात झटपट धंदा करा किंवा पैसे कमवा. पुढील जगात काय होईल सांगता येत नाही.

ब्लॅकबेरी, नोकिया, राजदूत गाडी, अँबेसिडर, लँडलाईन फोन, एसएमएस, ऑरकुट, रेडिफ/याहू मेल, सीडी, कॅसेट, टाईप राईटर अशी शेकडो उत्पादन बंद झाली, कारण ती काळानुसार बदलली नाहीत.

माझ्या अंदाजानुसार येत्या १० वर्षात काय बदल होतील?

पूर्णवेळ कार्यालये पध्दत बंद होईल. त्यामुळे कमर्शियल कॉम्प्लेक्स मॉलप्रमाणेच बंद होतील. फुड होम डिलिव्हरी वाढेल व रेस्टॉरंटचा धंदा ६०% कमी होईल, ब्युटीपार्लर ही घरपोच सेवा होईल.

घरपोच ऑनलाईन हेल्थ सेवा सुरू होणाऱ्या कंपन्या निघतील व मोठी फी घेणारे डॉक्टर व टोलेजंग हॉस्पिटलचे दिवाळं निघेल.

शिक्षण ऑनलाईन होईल. भव्य ईमारती असणाऱ्या शिक्षण संस्था खंडर बनतील. त्यामुळे बहुसंख्य शिक्षकांच्या नोकऱ्या जातील किंवा कित्येक महिने पगारच मिळणार नाहीत. कोचिंगची पध्दती पूर्ण बदलून ती ऑनलाईन होईल. प्रायव्हेट ट्यूटर व इन्ट्रक्टर यांचे काम खूप वाढेल. शॉर्ट व कमी खर्चातील व उपयोगी शिक्षणाला महत्व येईल.

सर्व राजकीय प्रचारप्रसार ऑनलाईनच असेल, रस्त्यावर भाषण, सभा, आंदोलने, मोर्चे इत्यादी मागास व खुळे समजले जातील. लोकांना उल्लू बनवायचा धंदा बंद होईल.

बँकाचे सर्व व्यवहार मोबाईलवर होतील. तुम्हाला केव्हाही बँकेत जाण्याची गरज पडणार नाही. मागास, सहकारी बँका पूर्ण बंद होतील.

चित्रपट हे मल्टिप्लेक्समध्ये पाहणे खूप कमी होईल. नवीन चित्रपटसुध्दा ऑनलाईन रिलीज होतील. टीव्ही पाहणे कमी होऊन सर्वजण मोबाईलवरच पाहतील. त्यामुळे टीव्ही चॅनेल तोट्यात जाऊन बरीच चॅनेल बंद होतील.

जात, धर्म, वंश ह्या संकल्पना १५ वर्षात संपतील, पैसा व गुण ह्या आधारेच विवाह ठरतील. फक्त पैसे कमविणार्‍याचेच विवाह ठरतील बाकीचे वरातीत नाचायला व मिरवणुकीलाच कामी येतील.

नोकर्‍या हा प्रकार झपाट्याने कमी होईल, फक्त प्रोफेशनल असतील. ९०% कंपन्या पली कामे आऊटसोर्स करतील, ह्या धंद्याला चांगले दिवस येतील. ९०% पेट्रोल, डिझेल गाड्या बंद होतील.

हे पुढील १५-२० वर्षात नक्कीच घडेल. या आव्हानासाठी आपण तयार आहात का?

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *