सर्वप्रथम मी चूक कोणाची..? या कादंबरीच्या अष्टपैलू लेखिका ज्यांनी सामाजिक व्यवस्थेतील “स्त्री मनाच्या अंतर्गत वेदनेला” हात घालून, स्त्रियांच्या वैवाहिक जीवनपटलावर अगदी डोळसपणे, जाणीवपूर्वक काळजीने लिखाण केले. अशा उदयोन्मुख नव्या दमाच्या, नव्या युगाच्या नामवंत लेखिका
डॉ. सौ. शुभांगी गणेश गादेगावकर याचं मनापासून आभार मानून अभिनंदन करतो…..💐💐🙏
कादंबरी वाचनात आल्यावर स्त्री मनाची…दुःखे, वेदना काय असतात या गोष्टीची उकल कादंबरीच्या लिखाणातून जाणवते. एक वाचक वर्ग म्हणून कादंबरीतील प्रत्येक प्रसंग वाचतांना काळजाला स्पर्शून जातो. प्रत्येक पात्र हे आपाल्या जागी योग्य आहे असे वाटते. चूक कोणाची..? ह्या कादंबरीच्या शीर्षकावर सर्व कादंबरी सामावलेली आहे. कादंबरीच्या प्रत्येक पात्राला लेखिकेने निस्वार्थपणे न्याय देणाचा प्रयत्न केला आहे. पुरूष प्रधान अशा सामाजिक व्यवस्थेतील स्त्रियांच्या जीवनावरील अन्यायाची साखळी तोंडून बंदीस्त होत असलेल्या जीवनाची मुक्तपणे जगण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा दिसते. परोपकारी भावनेची सांगड घालून दुखःमय जीवन व्यतित करणारी, लाचार झालेली, हळव्या मनाची प्रामाणिक व्यक्तिरेखा नायिकेने साकारली आहे.
स्त्रियांवर होणारे घरगुती अत्याचार…. अंगी असलेल्या सकारात्मक विचारांचा झालेला खून….घरांत फक्त पुरुषवर्गाने, नवऱ्याने स्वतःचा स्वार्थ अंगी बाळगून कामवासना पूर्तता करण्यासाठी साधलेली जवळीकता… पैशाची गरज… “काम खतम आदमी खतम” हा विचार डोक्यात ठेवून संसारात आचरणात आणलेला विचार मनाची एकाग्रता भंग करतो. लेखिकेच्या कादंबरीत असलेले प्रमुख पात्र ” रूपा ” हिच्या जन्मापासून ते वैवाहिक जीवन सुरू असलेल्या प्रत्येक गोष्टीवर जातीने प्रकाश टाकून नायिकेच्या दबलेल्या भावनांना शब्दात बंदिस्त करून जगासमोर मांडायचा पूर्णपणे यशस्वी प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
….गरिबीची जाण ठेवून सामान्य कुटुंबात जन्म घेतलेली कादंबरीची नायिका “रुपा” बालपणापासून प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी झगडतांना, संघर्ष करतांना दिसते. घर लहान पण मोठे कुटूंब…खाणारी आठ तोंड… गरिबी पाचवीला पुजलेली… बापाचा हातावर असलेला मोलमजुरीचा परंपरागत व्यवसाय… मिळणा-या तुटपुंज्या आर्थिक मिळकतीवर कुटुंबाची गुजराण…पोटासाठी रोज करावा लागणारा आटापिटा, संघर्ष..वाढलेलं व्यसनाच प्रमाण घरात नवराबायको यांच्यात होत असलेल भांडण…शिक्षणाची मुलांना शिकण्याची आस…या बऱ्याचशा बाबी…कादंबरीला वाचताना वाचकाला जागेवर खिळवून ठेवतात. रूपा नावाची कादंबरीची नायिका शिक्षण घेत असताना मनांत डॉक्टर व्हायचं स्वप्नं उराशी बाळगून ते न पूर्ण होता आल्याने…मन मारून परिचारिका ( नर्स ) या वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात प्रवेश घेते. शिक्षण पूर्ण झाल्यावर अनुभवासाठी वेड्यांच्या इस्पितळात झालेली नेमणूक… वेड्याच्या इस्पितळातून पळून जाण्याचा बेत…पळून गेल्यावर रेल्वे स्टेशन वरून दोघीही मैत्रिणीने घेतलेली माघार…दवाखान्यात येण्याचा प्रसंग… तसेच नोकरी करत असताना विवाह करण्याची धावपळ हे सर्व लेखिकेने अगदी प्रांजळपणे मांडले आहे.
वैवाहिक जीवनात सुरू झालेला प्रवास..व्यवसायाने वकील असलेला नवरा…त्यांची विकृत कलाकारी….नायिकेच्या भावनांचा झालेला खेळ…. एकाकी आलेलं नशिबातील जगणं…. संसाराच्या वेलीवर उमलेलं मुली रुपी फूल त्यांना नाकारणं. सासरच्या मंडळींची विचारसरणी, स्वभाव डोळ्यासमोर येतो.
प्रामाणिक जीवन जगणारी कादंबरीची नायिका ही प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी जीवाचा आटापिटा करतांना, धावताना दिसत आहे…नाकारणारा कर्मठ नवरा जेव्हा आजारी पडला तेव्हा बायकोकडे धावत येतो… घटस्फोट होऊन सुद्धा त्या व्यक्तीला आपलं सौभाग्यचं कुंकू आहे म्हणून छातीशी लावून घेणारी मोठ्या दिलाची नायिका ही कादंबरी वाचतांना वाचक वर्गाचे मन जिंकून घेते…
एक वाचक वर्ग.
महेश भामरे.
वांद्रे, मुंबई.
पुस्तकाचे स्वागत मूल्य कुरिअरसह १५० रू.
आजच आपली प्रत मागवा.
मोबाईल नं. ९६१९५३६४४१
गुगल पे नं. ९८६९१५८७६०