By : Shankar Tadas
* बंडू धोतरे यांची मागणी अखेर मान्य
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी खनिज विकास व अन्य स्रोतातून रामाळा तलाव संवर्धनाकरिता निधी देण्याचे आश्वासन दिल्यामुळे इको-प्रो संघटनेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांच्या उपोषणाची सांगता बाराव्या दिवशी झाली आहे.
चंद्रपूर येथील रामाळा तलाव संवर्धनाकरिता सुरू असलेल्या उपोषण सत्याग्रहाची सर्वप्रथम दखल राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली होती. दरम्यान विविध पक्ष, नेते, संघटना यांनी उपोषणास विविध माध्यमातून पाठबळ दिले होते.
रामाळा तलावाचा प्रश्न घेऊन इको-प्रोने ‘हाक’ दिली आणि सर्वसामान्य जनतेनी ‘साथ’ दिली. हा लढा केवळ इको-प्रोचा नव्हता, तर तो जनतेचा होता. १२ व्या दिवशी प्रशासनाने मागण्या मान्य केल्याने ‘अन्नत्याग सत्याग्रह’ मागे घेतला आहे. आता तलाव संवर्धनासाठी खऱ्या अर्थाने ‘सत्याग्रह’ सुरू होणार आहे. एक भाग लोकसहभाग मधून खोलीकरण व्हावे, लोकचळवळ व्हावी, आपले सुद्धा हाथ या कामास लागावे, म्हणून त्याला चंद्रपूरकर नागरिकांची अशीच साथ हवी आहे.
MTDC व्यवस्थापकीय संचालक चंद्रपूरचे पूर्व जिल्हाधिकारी आशुतोष सलील,
चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अतिरिक्त जिल्हाधिकरी विद्युत वरखेडकर, तहसीलदार निलेश गौड यांनी सुद्धा आपल्या पातळीवरून सहकार्य केल्याबद्दल बंडू धोतरे यांनी सर्वाचे आभार मानले आहे.